घरमहा @४८१६ - नांदेड लोकसभा मतदार संघ

१६ – नांदेड लोकसभा मतदार संघ

Subscribe

१६ - नांदेड लोकसभा मतदार संघाविषयी माहिती

मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेले नांदेड शहराला रामायण काळातले नंदीग्राम असे संबोधले जायचे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या रेणूका देवीचे मंदीर आहे. तसंच नांदेडमधअये गुरु गोविंदसिंह यांचे वास्तव्य आणि समाधी आहे.  नांदेड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १० हजार ५०२ चौरस किमी आहे. नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३३ लाख ५६ हजार ५६६ ऐवढी आहे. नांदेड जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते.

नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक असून मराठवाडा विभागात मोडतो. या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ येतात. नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशोक चव्हाण हे या मतदारसंघाचे खासदार आहेत.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १६

नाव – नांदेड

- Advertisement -

संबंधित जिल्हे – नांदेड

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेतीपीक – ज्वारी, कापूस

शिक्षणाचा दर्जा – ७५.४%

मतदारसंघ राखीव –  खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १० लाख १० हजार २६५

महिला-पुरुष मतदार

पुरुष – ५ लाख ४८ हजार ०३२

महिला – ४ लाख ६२ हजार २३३


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

प्रतापराव पाटील – भाजप – ४ लाख ८६ हजार ८०६

अशोक चव्हाण – काँग्रेस – ४ लाख ४६ हजार ६५८

यशपाल भिंगे – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ६६ हजार १९६

नोटा – ६ हजार ११४


नांदेड विधानसभा मतदारसंघ

८५ – भोकर – अमिता चव्हाण, काँग्रेस, १ लाख ७८१

८६ – नांदेड उत्तर – डी. पी सावंत, काँग्रेस – ४० हजार ३५६

८७ – नांदेड दक्षिण – हेमंत पाटील, शिवसेना – ४५ हजार ८३६

८९ – नायगाव – वसंतराव चव्हाण, काँग्रेस – ७१ हजार ०२०

९० – देगलूर ( अनुसुचित जाती) – सुभाष साबणे, शिवसेना – ६६ हजार ८५२

९१ – मुखेड – गोविंद राठोड, भाजप – १ लाख १८ हजार ७८१


Ashok Chavan
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

विद्यमान खासदार – अशोक चव्हाण, काँग्रेस

अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा आहे. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण याचे ते पुत्र आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. 8 डिसेंबर 2008 ते  राज्याचे 20 वे मुख्यमंत्री झाले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यामुळे अशोक चव्हाण सलग दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. अशोक चव्हाण हे राज्याच्या सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्याचे मंत्री होते. त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन, नगरविकास, सांस्कृतिक कार्य, माहिती व जनसंपर्क, गृहनिर्माण, कमाल नागरी जमीन धारणा, झोपडपट्टी सुधारणा, घरदुरुस्ती व पुर्नंबांधणी इ. जबाबदार्‍या देखील अशोक चव्हाण यांनी पार पाडल्या. मात्र 2009 च्या आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आदर्श घोटळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी अशोक चव्हाण हे एक आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार बी. पी पाटील यांचा 80 हजार 838 मतांनी पराभव केला होता.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

अशोक चव्हाण – काँग्रेस – ४ लाख ९१ हजार २९२

बी. पी पाटील – भाजप – ४ लाख १० हजार ४५४

राजरत्न आंबेडकर – बीएमयूपी – २८ हजार ३९६

नोटा – ३ हजार १५१

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -