Eco friendly bappa Competition
घर महा @४८ ४६ - रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

४६ – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

Subscribe

कोकणातील महत्वपूर्ण जिल्हा म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एक असणाऱ्या या मतदारसंघाची निर्मिती २००८ साली झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवेसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात रत्नागिरी जिल्ह्यातील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. ६ विधानसभा मतदार संघापैकी ५ मतदार संघामध्ये शिवसेनेची सत्ता आहे.

रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटीश काळात आणि त्यानंतर उत्तर रत्नागिरी म्हणून ओळखला जायचा. आताचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे दक्षिण रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १६ लाख ९६ हजार ७७७ ऐवढी आहे. तर एकूण क्षेत्रफळ ८ हजार २०८ चौरस किमी ऐवढे आहे. या जिल्ह्याची एकूण साक्षरता ही ६५.१३ टक्के ऐवढी आहे. या जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गड आणि किल्ले आहेत. हा जिल्हा हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द आहे. या जिल्ह्यात शेतीसोबतच शेती व्यवसायाशी संबंधित उद्योग देखील आहेत.

- Advertisement -

या मतदार संघात येणारा दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्याची स्थापना १ मे १९८१ साली झाली. या जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा असे होते. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ८ लाख ४८ हजार ८६८ ऐवढी आहे. तर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ५ हजार २०७ चौरस किमी ऐवढे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ३८ किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी आणि आंबा, फणस, काजू हे या जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत. या जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

मतदारसंघ क्रमांक – ४६

- Advertisement -

नाव – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

संबंधित जिल्हे – रत्नागिरी, सिंधुदुर्ग

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती, उद्योग

प्रमुख शेतीपीक – भात, आंबा, काजू, नारळ, फणस

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – ८ लाख ९६ हजार १७

महिला-पुरुष मतदार

पुरुष – ४ लाख ४४ हजार २६९

महिला – ४ लाख ५१ हजार ७४८

 


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

विनायक राऊत – शिवसेना – ४ लाख ५८ हजार ०२२

निलेश नारायण राणे – महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष – २ लाख ७९ हजार ७००

नविनचंद्र बाळचंद्र बांदिवडेकर – काँग्रेस – ६३ हजार २९९

मारूती रामचंद्र जोशी – वंचित बहुजन आघाडी – ३० हजार ८८२

निलेश भिकाजी भाताडे – अपक्ष – १७ हजार ६६८

नोटा – १३ हजार ७७७


रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ

२६५ – चिपळूण – सदानंद चव्हाण – शिवसेना

२६६ – रत्नागिरी – उदय सामंत – शिवसेना

२६७ – राजापूर – राजन साळवी – शिवसेना

सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ

२६८ – कणकवली – नितेश राणे – काँग्रेस

२६९– कुडाळ – वैभव नाईक – शिवसेना

२७०– सावंतवाडी – दिपक केसरकर – शिवसेना

MP Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

विद्यमान खासदार – विनायक राऊत, शिवसेना

विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार असून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. राजापूरमध्ये येऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे.म१९९९-२००४ मध्ये विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून विधासभा निवडणूक लढली आणि ते विलेपार्ले येथून आमदार म्हणून निवडून आले. २०१२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. २७ मे २०१४ रोजी त्यांनी विधानसभेतील पदाचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून उभे राहिले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार विनायक राऊत हेच असणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता यावेळीची लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत निवडणूक लढणार आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

विनायक राऊत – शिवसेना, ४ लाख ९३ हजार ८८

निलेश राणे – काँग्रेस – ३ लाख ४३ हजार ३७

नोटा – १२ हजार ३९३

- Advertisment -