घरमहाराष्ट्रजायकवाडीत मृतावस्थेत आढळले विदेशी पक्षी

जायकवाडीत मृतावस्थेत आढळले विदेशी पक्षी

Subscribe

पक्षीप्रेमी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या सावटानंतर महाराष्ट्रासह इतर देशात बर्ड फ्लूचा संसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरु आहे. दरम्यान मागील तीन दिवसांपासून जायकवाडी धरणावर काही पक्षी मृतावस्थेत आढळले असून, हे पक्षी विदेशी आहेत. पक्ष्यांचा नक्की मृत्यू कशाने झाला याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. अशा सततच्या घटनेमुळे पक्षीप्रेमी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पक्षी अभयारण्य वन्यजीव विभागीय अधिकारी विजय सातपुते यांनी याबाबत चौकशी केली आहे. पशुवैद्यकीय विभागाने मृत पक्षी ताब्यात घेऊन, ते पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. जायकवाडी धरणावर मंगळवारी सकाळी विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. बर्ड फ्लूच्या भीतीने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १० ते १२ मृतावस्थेतील पक्षी धरणाच्या साखळी क्रमांक ११९ ते १२० येथे आढळून आले.

पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय

मृतावस्थेत आढळलेले विदेशी पक्षी हे मध्य आशिया मधून आलेले टपडेट पॅचाड या जातीचे असल्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी हिवाळ्यात हे पक्षी जायकवाडी धरणावर येतात. हवामान बदलामुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. जायकवाडी धरणावर मासेमारी केली जाते. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन्यजीव विभागाने वर्तवला आहे. या घटनेनंतर कोरोनाचे संकट कायम असताना बर्ड फ्लूचाही संसर्ग जायकवाडीत होतो की काय, अशी शंका नागरिकांमध्ये उद्भवत आहे. फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतरच या घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – अमरावती ,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही – आरोग्य विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -