घरउत्तर महाराष्ट्रशेतजमीन मोजणीसाठी लाच घेणार्‍या भूमी अभिलेखच्या सहायकास अटक

शेतजमीन मोजणीसाठी लाच घेणार्‍या भूमी अभिलेखच्या सहायकास अटक

Subscribe

शेतजमीन मोजणीसाठी तारीख देण्याच्या मोबदल्यात तक्ररदाराकडून शुक्रवारी (दि. 1) दीड हजार रुपयांची लाच घेताना चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मुख्यालय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अंजीनाथ बाबूराव रसाळ (वय 50) असे अटक केलेल्या मुख्यालय सहायकाचे नाव आहे.

अंजीनाथ रसाळ भूमी अभिलेख कार्यालय चांदवड येथे मुख्यालय सहायक आहेत. तक्रारदारांची वडिलोपार्जित शेती आहे. शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याचे मोबदल्यात रसाळ याने तक्रारदाराकडे शुक्रवारी (दि. 1) 3 हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 1 हजार 500 रूपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदाराकडून शुक्रवारी दीड हजार रुपये घेताना पथकाने रसाळ यास अटक केली. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -