घरCORONA UPDATEकाळजी घ्या! पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे ५५९ नवे रूग्ण!

काळजी घ्या! पुण्यात एका रात्रीत कोरोनाचे ५५९ नवे रूग्ण!

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पुण्यात एका रात्रीत ५५९ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याची रूग्णांची संख्या ५४५७२ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १३८७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ३४३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सोमवारी पुण्यात २ हजार ६०१ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली होती. तर ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून मास्क वापरण्याबाबत देखील कठोर पावले उचलली जात असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पुण्या सारख्या इतर शहरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क न घातला बाहेर पडल्यास ५०० ते १००० रुपये दंड आकारण्यात येत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा- धक्कादायक! पुण्यातील कोरोनाबाधित महिलेने थेट गाठली दुबई!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -