घरताज्या घडामोडीहिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपाला आव्हान

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपाला आव्हान

Subscribe

'भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात', असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केले.

‘भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात’, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केले. शिवसेना भवनात आज राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. (if you have the courage show it by holding mid term elections shiv sena leader uddhav thackeray challenged bjp)

पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच, “विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात

- Advertisement -

शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात”, असे म्हटले. विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

  • लढायचे असेल तर सोबत राहा.
  • भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव.
  • असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ.
  • आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल.
  • तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल.
  • घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात.
  • सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा
  • देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या
  • विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान

हेही वाचा – राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -