छत्तीसगड- महाराष्ट्र बॉर्डरवर नक्षलवाद्यांशी चकमक; गोळीबारात एक जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरु

1 jawan injured referred to nagpur by airlift search opration continues
छत्तीसगड- महाराष्ट्र बॉर्डरवर नक्षलवाद्यांशी चकमक; गोळीबारात एक जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरु

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली परिसरात मंगळवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुमारे अर्धा सुरु असलेल्या या चकमकीत 1 जवान जखमी झाला असून त्याला विमानाने तात्काळ नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील ही चकमक सध्या थांबली असली तरी जवानांची मोठी फौज त्याठिकाणी तैनात आहे. सध्या संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. हे प्रकरण धोधराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाटपार-इरपनारच्या जंगलात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी शोध मोहिम सुरु केली. त्याचवेळी आधीच लपून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही मोर्चा सांभाळात नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. मात्र या चकमकीत एका जवानालाही गोळी लागली आहे.

जखमी जवानाला सहकारी जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून बाहेर काढले. त्यानंतर त्याला एअरलिफ्ट करत नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले. जिथे जवानावर उपचार सुरू आहेत. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की, जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरु असून जवान अद्यापही घटनास्थळावरून परतले नाही.


EID 2022 : मुस्लीम समाजाबाबत जो बायडेन यांचे मोठे विधान, ‘जगभरातील मुस्लिम ठरतायत हिंसाचाराचे बळी’