घरठाणेBooster Dose : ठाणे जिल्ह्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला बूस्टर...

Booster Dose : ठाणे जिल्ह्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

Subscribe

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार शुक्रवारी रात्री आठपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २८ हजार १९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यात १ लाखापेक्षा अधिक नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ कोटी २३ लाख ९ हजार ३१५ डोसेस देण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६७ लाख ८८ हजार ७९ नागरिकांना तर ५४ लाख १९ हजार ९४३ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १ हजार २९३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३९० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने १० जानेवारीपासून जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू केला आहे. तसेच २२ जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यात ३८.४२ टक्के जणांनी बूस्टर डोस घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.


हेही वाचा : मीटरचे अचूक रीडिंग घेणाऱ्या एजन्सीजवर कठोर कारवाई करणार, विजय सिंघल यांचा इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -