घरताज्या घडामोडीकोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू; राज्यात २१ दिवसांत २८ कोरोनाग्रस्त पोलिसांचा बळी

कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू; राज्यात २१ दिवसांत २८ कोरोनाग्रस्त पोलिसांचा बळी

Subscribe

टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शंकर राजाराम शिबे यांचा कोरोमामुळे मृत्यू झाला असून राज्यात २१ दिवसांत २८ कोरोनाग्रस्त पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शंकर राजाराम शिबे यांचा कोरोमामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री सौमेय्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या ४९ वर गेली आहे.

शंकर शिबे यांच्याविषयी…

शंकर शिबे हे नवी मुंबईतील कौपरखैरणे, रुक्मिणी अपार्टमेंटच्या रुम क्रमांक ए विंगच्या १९१/१९२ मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. २२ जूनला त्यांना थंडीताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना चुन्नाभट्टी येथील सौमेय्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

- Advertisement -

गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यावर तिथेच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्यांची प्रकृती प्रचंड बिघडली होती. रात्री दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती नंतर टिळकनगर पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. कोरोनामुळे आतापर्यंत मुंबई पोलीस दलात तीन पोलीस अधिकार्‍यांसह ४६ पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २१ दिवसांत २८ पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दुसरीकडे १ हजार ५६७ कोरोनाबाधित पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यात १९२ पोलीस अधिकारी आणि १ हजार ३७५ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

- Advertisement -

१ हजार ५६७ पोलिसांवर उपचार सुरु

गेल्या चार दिवसांत २०० हून अधिक पोलिसांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत राज्यातील विविध रुग्णालयात १ हजार ५६७ पोलिसांवर उपचार सुरु होते. सोमवारी दिवसभरात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्य पोलीस दलातील संख्या आता ८८ झाली आहे. त्यातील २८ पोलिसांचा मृत्यू २१ दिवसांत झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३१५ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८८१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – Coronavirus Update in Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,३६९ नवे रूग्ण; २४६ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -