घरताज्या घडामोडीशिवसेना खासदार राजेंद्र गावितांना दणका, १ वर्षाचा तुरुंगवास अन् कोटींच्या दंडाची शिक्षा

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना दणका, १ वर्षाचा तुरुंगवास अन् कोटींच्या दंडाची शिक्षा

Subscribe

जमीनीचा व्यवहार गेल्या अनके वर्षांपासून सुरु होता. पैसे देतो असे गावित सांगत होते यानंतर बाफना यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एका चेक बाऊन्सच्या केसमध्ये खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटींचा दंड ठोठावला आहे. एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंडाची शिक्षा खासदार राजेंद्र गावित यांना सुनावण्यात आला आहे. एका भूखंड व्यवहारात राजेंद्र गावित यांनी चेक दिले होते. परंतु चेक बाऊन्स झाल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गावित यांच्याविरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता यावर न्यायालयाने सुनावणी करताना गावितांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शिक्षा देण्यापूर्वी शिक्षेविषयी दोन्ही फिर्यादींचे काय म्हणणे आहे असे विचारण्यात आले होते. यावर आरोपी खासदारांनी रक्कम २०१४ मध्ये घेतली होती. जमीन विकसित करण्याचा करार करुन दिला होता. कराराची पुर्तता केली नाही म्हणून २०१७ मध्ये दिवाणी कोर्टात दावा करण्यात आला होता.

- Advertisement -

जमिनीचा एक व्यवहार होता यामध्ये १८ मार्चरोजी चेक बाऊन्सप्रकरणी बाफना कोर्टात गेले होते. गावित यांना १ महिन्याची मुदत जामीन अर्जासाठी दिला आहे. परंतु जमीनीचा व्यवहार गेल्या अनके वर्षांपासून सुरु होता. पैसे देतो असे गावित सांगत होते यानंतर बाफना यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील दोन नेत्यांवर कारवाई

महाविकास आघाडीमधील दोन नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावरही चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बच्चू कडू यांच्यावर २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिज्ञा पत्रामध्ये फ्लॅट असल्याची माहिती दिली नव्हती. निवडणूक आयोगाला माहिती दिली नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कऱण्यात आली आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडूंविरोधात कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, नवाब मलिकांचे काँग्रेसच्या भूमिकेवर सूचक विधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -