घरताज्या घडामोडीबिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या इतिका लोटच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या इतिका लोटच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

Subscribe

पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमध्ये राहणारे अखिलेश लोट यांची दीड वर्षांची मुलगी इतिका हिचा बिबट्याच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन वन खात्याने सापळा रचून सदर बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे आरे मधील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मुंबई : पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमध्ये राहणारे अखिलेश लोट यांची दीड वर्षांची मुलगी इतिका हिचा बिबट्याच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन वन खात्याने सापळा रचून सदर बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे आरे मधील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नाने इतिका हिच्या कुटुंबियांना शासनाकडून दहा लाखांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. आणखीन दहा लाखांची मदत नंतर देण्यात येणार आहे. (10 lakhs to the family of Ikita Lot who died in a leopard attack)

मुंबईत एकीकडे दिपावली धुमधडाक्यात साजरी होत असताना दीपावलीच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सुमारास गोरेगाव, आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १५ येथे इकिता लोट (दीड वर्षे) हीच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात इतिकाचा दुर्देही मृत्यृ झाला. सदर घटनेनंतर स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली होती. तसेच, इतिकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले होते. त्याचप्रमाणे काही प्रमाणात आर्थिक मदतही केली होती.

- Advertisement -

मात्र आमदार वायकर यांनी, दुर्दैवी मृत इतिकाच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार मदत करण्याबाबतची सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. राज्य शासनाच्या नियमानुसार इतिकाच्या कुटुंबियांना एकूण २० लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून इतिकाच्या वारसांना पहिल्या टप्प्यात १० लाखांचा चेक आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आला. तसेच उर्वरीत १० लाख रुपये ‘फिक्स डिपॉझिट्स’स्वरूपात इतिका हिच्या वडीलांच्या नावे येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे.

यावेळी वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी राकेश भोईर, वनपाल अधिकारी नारायण माने, रामा भांगरे, धुरी, वनरक्षक सुरेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, मयुरी रेवाळे, हर्षदा गावडे, राहुल देशपांडे, पुजा शिंदे, अजय प्रधान, वैभव कांबळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकरांची अडचण वाढणार?, सोमय्यांकडून पुन्हा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -