छत्तीसगड : नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आज (22 नोव्हेंबर) माहिती दिली. त्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून सर्वांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (10 Naxalites killed by security forces in encounter in Chhattisgarh)
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भंडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागातील कोंटा आणि किस्टाराम परिसरात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यावर गरिआबंद पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या ऑपरेशनमध्ये गारियाबंद डीआरजी, कोब्रा 207 बटालियन, ओडिशा एसओजी, सीआरपीएफ 211 आणि 65 बटालियनचे सुमारे 200 जवान सहभागी झाले होते.
हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितल्या ‘मविआ’च्या किती जागा येणार? NCP च्या उमेदवारांना म्हणाले, जोपर्यंत…
पोलिसांचे पथक आमदच्या जंगलात पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर वरील सर्व ठिकाणी पथक असताना नक्षलवाद्यांनी डीआरजी पथकावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर सुरक्षा दलांनी या भागात आतापर्यंत 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह, इन्सास रायफल, एके-47 रायफल, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. चकमकीशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,
मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी सुरक्षा दलांच्या यशाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, आमचे सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. बस्तरमध्ये विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलांनी या वर्षी चकमकीच्या विविध घटनांमध्ये 207 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते, शी माहितीही विष्णु देव साई यांनी दिली.