घरताज्या घडामोडीकोरोनाविरोधातील लढाईत सर्व वयोगटांसाठी 'विराफीन' असरदार! राज्यात १० जणांवर चाचणीची डॉ. तात्याराव...

कोरोनाविरोधातील लढाईत सर्व वयोगटांसाठी ‘विराफीन’ असरदार! राज्यात १० जणांवर चाचणीची डॉ. तात्याराव लहानेंची माहिती

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्याचा निर्णय घेत कोरोनाची तिसरी रशियाची स्पुटनिक व्हीला DCGI कडून काही दिवसांपूर्वी मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता कोरोना लसीसोबत कोरोनाचे औषधं देखील सज्ज झाले आहे. DCGI कडून आज झायडस कॅडिलाच्या ‘विराफीन’ औषधाला आपात्कालीन वापरण्यासाठी मंजूरी दिली आहे. हे औषधं फक्त प्रौढांना आणि जे रुग्ण देखरेखी खाली आहेत त्यांच्या वापरासाठी मिळणार आहे. दरम्यान हा औषधांचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. महाराष्ट्रातल्या १० रुग्णांवर चाचणी करण्याची आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे.

तात्याराव लहाने म्हणाले की, ‘झायडस कॅडिलाच्या विराफीन औषधाची चाचणी महाराष्ट्रातल्या १० रुग्णांवर करण्यात आली. सर्व वयोगटातील रुग्णांसाठी हे औषधं प्रभावी आहे. या औषधामुळे रुग्ण लवकर बरा होता. आता DCGI कडून झायडस कॅडिलाच्या विराफीन औषधाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विचार करून काही रुग्णांवर औषधाचा वापर केला जाईल आणि मग आपल्याला लक्षात येईल याचा अनुभव काय आहे? आणि याचा किती फायदा होऊ शकतो.’

- Advertisement -

दरम्यान झायडस कॅडिला कंपनीकडून विराफीन औषधं ९१.१५ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आलं असून हे औषध घेतल्यानंतर ७ दिवसात कोरोना बरा होतो असा दावा करण्यात आला आहे.


हेही वाचा – Oxygen Shortage: महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा आता एअरलिफ्टच्या पर्यायाने – राजेश टोपे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -