Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्रातही निर्भया , पुण्यात १४ वर्षीय मुलीवर १० जणांचा सामूहिक बलात्कार

महाराष्ट्रातही निर्भया , पुण्यात १४ वर्षीय मुलीवर १० जणांचा सामूहिक बलात्कार

मुलीची प्रकृती गंभीर * हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू * आठ नराधमांना अटक

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात विशेषत: राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात दिल्लीतील निर्भयासारखी एक संतापजनक घटना घडली आहे. १० नराधमांनी १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या अशा घटनांमुळे या पुरोगामी महाराष्ट्राची नेमकी वाटचाल आता कोणत्या दिशेला होतेय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्राची एक वेगळी आणि चांगली अशी ओळख आहे. पण महाराष्ट्राच्या पोटात विशेषत: पुण्यात अशा प्रकारची घटना उघड झाल्याने मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या मुलीची प्रकृती गंभीर असून पुण्यात एका इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित 1४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री आपल्या मित्राला भेटायला पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. मात्र, तिचा मित्र तेथे आलाच नाही. त्यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर १० जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आणखीनही काही आरोपींचा सहभाग असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

या अल्पवयीन मुलीला पुण्यातील एका इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. ह्या कारवाईने त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 1४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षाचालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -