घरताज्या घडामोडीOmicron Variant: राज्यात ओमिक्रॉनचा वाढला वेग! आज ओमिक्रॉनच्या १० नव्या रुग्णांची नोंद

Omicron Variant: राज्यात ओमिक्रॉनचा वाढला वेग! आज ओमिक्रॉनच्या १० नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

देशात ओमिक्रॉन रुग्णांचा वेग झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रात आणखीन १० ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. विमानतळावर जवळपास ३० हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामधील १० जणांचा ओमिक्रॉन असल्याचे आढळले आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद २०वर पोहोचली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहत असलेले डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, विमानतळावर आलेल्या जवळपास ३० हजार प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी काल मुंबईत दोन ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली होती. आता महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या २०वर पोहोचली आहे. तसेच देशभरात ओमिक्रॉनचे एकूण ३३ रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान राज्याचे मंत्री अस्लम शेख म्हणाले की, मुंबईला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जे लोकं बाहेरून येत आहेत, त्यांच्यासाठी कोविड सेंटर तयार केले आहे. शिवाय २० हॉटेल आहेत, जिथे ते राहू शकतात. सर्व रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicronमधून रिकव्हर झाल्यानंतर बंगळुरूच्या डॉक्टराला पुन्हा कोरोनाची लागण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -