मुंबईनंतर ठाण्यात १० टक्के पाणीकपात

मुंबईनंतर आता ठाणे महापालिकेनेही १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. एक पत्रक जारी करत ठाणे महापालिकेने पाणीकपातीची माहिती दिली.

Water Cuts in Thane

मुंबईनंतर (Mumbai) आता ठाणे (Thane) महापालिकेनेही १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. एक पत्रक जारी करत ठाणे महापालिकेने (TMC) पाणीकपातीची माहिती दिली. अपेक्षित पाऊस न पडल्याने मुंबई महापालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात (Water Supply) १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (10 percent water cut in thane decision by tmc)

ठाणे महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्राच्या माहितीनुसार, “मुंबई महापालिकेने (BMC) १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही १० टक्के पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यालाही लागू आहे. त्यामळे मुंबई महापालिकेकडून ठाणे महानगरपालिकेला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे लिहिले आहे.

हेही वाचा – पुढील ३-४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

त्याशिवाय, “पाणी कपात लागू असताना अतिरिक्त जलजोडणी अथवा वाढीव जलजोडणीच्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी”, असेही या आदेशात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दररोज ३,८५० ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे.

तलावातील शिल्लक पाणीसाठा व दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास मुंबईला पुढील ४० दिवस म्हणजे येत्या २ ऑगस्टपर्यन्त पुरेल इतका आहे. मुंबईकरांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले होते.


हेही वाचा – केतकी चितळेला दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश