घरमहाराष्ट्र10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो शाळा, कॉलेजात 75 टक्के उपस्थिती बंधनकारक; शिक्षण...

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनो शाळा, कॉलेजात 75 टक्के उपस्थिती बंधनकारक; शिक्षण विभागाचा आदेश

Subscribe

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. 2023 पासून म्हणजे पुढील वर्षापासून हा आदेश लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाने याबाबदत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, येत्या फेब्रुवारी-मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रत्येक सत्रात 75 टक्के असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. (10 th and 12 th standard students 75 percent attendance is compulsory)

यामुळे संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाचं पुढील वर्षात प्रवेश दिली जाईल. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंक करणाऱ्या विद्यार्थांना या नव्या आदेशामुळे चांगलाचं फटका बसणार आहे.

- Advertisement -

यापूर्वी सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता. सीबीएसई अभ्यासक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. सीबीएसनने 18 जुलैला शाळांना परिपत्रक पाठवत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे . त्यामुळे सीबीएससी पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळानेही विद्यार्थ्यांच्या 75 टक्के उपस्थितीबाबत निर्णय घेतला आहे.

यामुळे संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सदर बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देशही शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत.


हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबवणार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -