घरताज्या घडामोडीआरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करणार; मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करणार; मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

Subscribe

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच 25 ते 26 मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल आणि 27 एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. (10 thousand posts will be recruited in the health department announcement of girish mahajan)

मागील अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित असून, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती. सुमारे साडे अकरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांनी परीक्षा शुल्कही भरले होते. परंतु विविध कारणांनी परीक्षा झाली नाही. मात्र सत्तेतले नवे सरकार युवकांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसार पुढच्या 2 महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित 10 हजार 127 जागांची भरती होणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात राज्यात मागील 2 ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

भरतीचे वेळापत्रक

- Advertisement -
  • 1 जानेवारी ते 7 जानेवारी – भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
  • 25 जानेवारी ते 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
  • 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर.
  • 25 मार्च आणि 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल.
  • 27 मार्च ते 27 एप्रिल – या कालावधीत उमेदवारांची निवड.

हेही वाचा – या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, मनसेच्या ‘दोपोत्सवा’बाबत मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -