घरताज्या घडामोडीपोलिसांसाठी हक्काचे १०० खाटांचे कोविड सेंटर उभारणार : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय

पोलिसांसाठी हक्काचे १०० खाटांचे कोविड सेंटर उभारणार : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणताही पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाला बळी पडून मृत्यू होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय उपाययोजना करत आहेत. पोलिसांसाठी हक्काचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयातील भीष्मराज सभागृहात १०० खाटांचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यानंतर पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि.७) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व पौर्णिमा चौगुले उपस्थित होते.
पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले, पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. त्यासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियोजनही केले जात आहे. शहरात दीडशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सध्या १८ बाधित पोलीस रूग्णालयात व २३ होम क्वारंटाईन आहेत. आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनाने बळी गेला आहे.

- Advertisement -

पोलिसांसाठी हक्काचं कोविड सेंटर उभारले जात आहे. मंगळवारपासून पोलीस आयुक्तालयात कोविड सेंटर सुरु केले जाणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा झाली आहे. कोविड सेंटर शासनमान्यता सेंटर असणार आहे. या ठिकाणी पोलीस व होमगार्डवर उपचार केले जाणार आहे. या ठिकाणी लक्षणे दिसून येणार्‍यास व्यक्तीस दाखल केले जाणार आहे. पोलिसांची स्वास्थ तंदुस्त रहावे, त्यांचे मनोबल वाढावे, यासाठी पोलिसांसाठी रूग्णवाहिकाही उपलब्ध केल्या जाणार आहेत. पोलिसांनी संपर्क साधल्यास त्यांना रुग्णवाहिकांचा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -