नवी मुंबई विमानतळासाठी बोअर ब्लास्टिंग, 100हून अधिक घरांना तडे

वहाळ गावा शेजारी असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील टेकडीच्या सपाटीकणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सापाटीकरणासाठी बोर ब्लास्टींग केले जाते आहे. परंतु, दररोज होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील शंभर पेक्षा अधिक घरांना भुंकपासारखे हादरे बसून तडे गेले आहेत.

navi mumbai airport

वहाळ गावा शेजारी असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील टेकडीच्या सपाटीकणाचे काम सुरू आहे. टेकडीच्या सापाटीकरणासाठी बोर ब्लास्टींग केले जाते आहे. परंतु, दररोज होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील शंभर पेक्षा अधिक घरांना भुंकपासारखे हादरे बसून तडे गेले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या बोअर ब्लास्टिंगविरोधात वहाळ ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा सिडकोला दिला आहे. (100 houses cracked due to blasting work for navi mumbai airport)

बोअर ब्लास्टिंग बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विमानतळाच्या कामासाठी डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण सुरू असून, यासाठी बोअर ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे.

त्यानुसार, दररोज दुपारच्या सुमारास सापाटीकरणासाठी बोअर ब्लास्टिंग केले जात आहे. यासाठी विमानतळाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र या बोअर ब्लास्टिंगसाठी शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटकांच्या प्रमाणाचा वापर ठेकेदार कंपनीकडून केला जात आहे.

अनेक घरांना तडे गेल्यामुळे वित्त व जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी आता सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोअर ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा – भाजपाचे राज्य आल्यापासून धर्माचे राज्य व देशावर देवाची कृपा झाल्याचा प्रचार; सामनाच्या ‘रोखठोक’मधून निशाणा