यंदा १ ली ते १२ वी १०० टक्के अभ्यासक्रम

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३पासून पुन्हा इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

cbse date sheet 2022 cbse 10th 12th term 1 exam datesheet released students check here

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या होत्या, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३पासून पुन्हा इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (100 percent syllabus for first to 12th standard)

हेही वाचा – मुंबईतील मतदारांमध्ये ७ लाखांनी वाढ; मतदार यादी प्रसिद्धी

मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शाळा ऑनलाईन माध्यमातून चालवण्यात आल्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत होते. ऑनलाईन शिक्षणात येत असलेल्या समस्या लक्षात घेता पालक व विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी होऊ लागली होती.

परिणामी कोरोनामध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मधील कोरोनाची परिस्थिती २०२१-२२मध्ये कायम राहिल्याने शालेय शिक्षण विभागाने या वर्षातही कमी केलेला पाठ्यक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये प्रत्यक्ष वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर यंदापासून १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.