घरअर्थजगतशंभर वर्ष जुन्या बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांना पैसे परत मिळणार का?

शंभर वर्ष जुन्या बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांना पैसे परत मिळणार का?

Subscribe

मुंबई – आर्थिक डबघाईला आल्यामुळे सोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. ही बँक शंभर वर्षे जुनी असून या बँकेला सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

बँक आर्थिक अडचणीत आल्याची माहिती मिळताच या बँकेतील ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढून घेण्याकरता मोठी गर्दी केली होती. मात्र, ठेवीदारांचे पैसे परत मिळाले नाहीत. काही ठेवीदारांना पैसे मिळाले असून अजून ९४ हजार ठेवीदार आपल्या पैशांच्या प्रतिक्षेत आहेत. या बँकेवर तब्बल १०५ कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे असून लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेवीदारांना पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द, 22 सप्टेंबरपासून बँकिंग कामकाज बंदीचे आदेश

आर्थिक डबघाईला आल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. तसंच, या बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलाय. या बँकेतील ९५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी, विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत दिले जाणार आहे. बँकेवर प्राशसक नेमल्याने बँकेचे ठेवीदार आता ५ लाख रुपयांपर्यंताचा दावा करू शकतात.

- Advertisement -

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेला 22 सप्टेंबरपासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. रिझर्व्ह बँकेने रुपी कोऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही असा ठपका ठेवला आहे.

हेही वाचा – मुख्य अनुपालन अधिकारी नियुक्त करा; आरबीआयकडून मोठ्या नागरी सहकारी बँकांसाठी नवे निर्देश

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -