घरCORONA UPDATEदिलासादायक : कस्तुरबा रुग्णालयातून 'कोरोना‌ कोविड-१९'चा १०० वा रुग्ण घरी परतला!

दिलासादायक : कस्तुरबा रुग्णालयातून ‘कोरोना‌ कोविड-१९’चा १०० वा रुग्ण घरी परतला!

Subscribe

विशेष म्हणजे या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू होत असले तरी आतापर्यंत घरी पाठवण्यात आलेल्या १०० रुग्णांपैकी २४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

‘कोरोना कोविड- १९’ची बाधा झालेल्या रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू होत असले तरी या आजाराने अनेक रुग्ण बरे होवून घरी परतत आहेत. कस्तुरबा रुग्णालयातून शंभरावा रुग्ण मंगळवारी बरा होवून घरी परतला आहे. विशेष म्हणजे या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू होत असले तरी आतापर्यंत घरी पाठवण्यात आलेल्या १०० रुग्णांपैकी २४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाने ‘करोना कोविड- १९’ या आजाराशी सुरू असलेल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंगळवार याच रुग्णालयातून ‘कोरोना कोविड १९’ ने बाधित शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतण्यापूर्वी निरोप घेताना या रुग्णाने कस्तुरबा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावाने काम करीत असलेले डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे व्यक्तिशः आभार मानले आहेत.

- Advertisement -

मुंबईत मार्चमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला

साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण मुंबईत ‘कोरोना कोविड १९’चा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कस्तुरबा रुग्णालय हे ‘कोरोना कोविड १९’ने बाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.

२४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

कस्तुरबा रुग्णालयातून आजवर १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ६० पुरुषांचा आणि ४० महिलांचा समावेश आहे. तसेच यामध्ये ६० वर्षावरील वय असणाऱ्या २४ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर १० वर्षाखालील ७ बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये समावेश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -