Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात १०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तिघांचा मृत्यू!

coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३ बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार १२६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णालयातील भरती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजार पार झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ५ हजार १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सिटी एंट्री पॉईंटवरील ४, शहरातील ८० आणि ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तीन कोरोनाबाधित मृतांमध्ये बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरुष, वंजारवाडीतील ७० वर्षीय महिला आणि ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

राज्यात १० हजारांहून अधिक बाधित रुग्णांची वाढ

बुधवारी तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ६०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ५५२ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२ % एवढे झाले आहे.


हेही वाचा – Corona Update: देशात कोरोनाने रेकॉर्ड तोडला, २४ तासांत ४५ हजार ७२० नव्या रुग्णांची नोंद