घरताज्या घडामोडीनाशिकसाठी १०५ मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा मंजूर करावा

नाशिकसाठी १०५ मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा मंजूर करावा

Subscribe

खासदार गोडसे यांनी घेतली अन्न, औषध आयुक्तांची भेट

जिल्ह्यात कोरोनाचे पन्नास हजार रुग्ण असून ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. शासनाकडून मिळणारा ८५ मे.टन ऑक्सिजन खूपच कमी पडत असून दररोज १०५ मे.टन ऑक्सिजनच्या कोट्यास तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त बी.आर.गहाणे यांच्याकडे केली.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातल्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यासंदर्भात खासदार गोडसे यांनी अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त बी.आर. गहाणे यांची मुंबईत भेट घेउन चर्चा केली. विविध कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण नऊ ऑक्सिजन साठवणुकीचे केंद्र असून दोन केंद्रांकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होण्याचे प्रमाण अत्यल्प असून शासनाकडून दररोज अवघा ८५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झालेला आहे.पैकी प्रत्यक्ष ७५ मॅट्रीक टनच ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जातो. हा साठा खूपच कमी असल्याने जिल्ह्यात ऑान्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी रोज 75 ऐवजी दररोज 105 मेट्रिक टन ऑक्सिजनच्या कोट्यास मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी खासदार गोडसे यांनी सहआयुक्त बी.आर. गहाणे यांच्याकडे केली आहे. यावेळी गणेश रोकडे,विजय शिंगवी आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -