Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Corona Mutant: धक्कादायक! पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे १०८ म्युटंट!

Corona Mutant: धक्कादायक! पुण्यातील सांडपाण्यात आढळले कोरोनाचे १०८ म्युटंट!

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही कायम आहे. आतापर्यंत देश-विदेशात कचऱ्यात, गटारात कोरोनाचे प्रकार आढळल्याचे समोर आले आहे. हैदराबाद, मुंबईतील धारावी आणि अलीकडे लखनऊमध्ये हे प्रकार आढळले आहेत. पण गटातील सांडपाण्यात किती कोरोनाचे प्रकार म्हणजे म्युटंट आहेत? याबाबत देशात पहिल्यांच अभ्यास करण्यात आला. ज्याचा निकाल हैराण करणारा आला आहे. राज्यातील पुण्यामधील सांडपाण्यात कोरोनाचे १०८ म्युटंट आढळले आहेत.

आतापर्यंत देशात जिनोम सिक्वेसिंगच्या आधारे एवढे म्युटंट कधीच आढळले नव्हते. पण पुण्यातील सीएसआयआरच्या नॅशनल केमिकल लेबोरेटरीमध्ये जेव्हा सहा वेगवेगळ्या नमुन्यांची चाचणी केली गेली, तर काहींमध्ये २० तर काहींमध्ये ३५ म्युटंट आढळले. अध्ययन दरम्यान वैज्ञानिकांना सांडपाण्यात डेल्टा आणि अल्फा व्हेरियंट आढळला. तसेच दक्षिण आफ्रिका, ब्राझिल आणि अमेरिकामधील वेगवेगळे व्हेरियंट देखील येथे आढळले आहेत.

- Advertisement -

पुण्यातील नॅशनल कलेक्शन ऑफ इंडस्ट्रीयल मायक्रोऑर्गेनिझम्स (NCIM), गाझियाबादचे अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (ACSIR), इकोसन सर्व्हिसेज फाउंडेश (ESF) आणि नॅशनल केमिकल लेबोरेटरी (CSIR) यांनी मिळून हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास मेडिकल जर्नल मेडरेक्सिवमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

एनसीआयएमचे डॉ. महेश धरणे म्हणाले की, ‘आम्ही खुल्या कचऱ्याचा अभ्यास केला, ज्यामध्ये नाल्यातील नमुने घेऊन व्हायरसची चाचणी घेण्यात आली. तसेच म्युटंटबाबत देखील अभ्यास केला गेला. डिसेंबर २०२० पासून ते २०२१पर्यंत केलेल्या अभ्यासात कोरोनाचे १०८ म्युटंट आढळले. तर सहा नमुन्यांमध्ये ३५ प्रकारचे व्हायरल आढळले. भारतातील हा पहिलाचा अभ्यास आहे, ज्यामध्ये सांडपाण्यात म्युटंट आढळले. तसेच यामुळे इशारा देखील मिळाला.’

- Advertisement -

वैज्ञानिकांना असे चार म्युटेशन आढळले, ज्याचा आजपर्यंत भारतात एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. इतर देशांमध्ये हे म्युटेशन आढळले आहे. याबाबत डॉ. महेश धरणे म्हणाले की, ‘चार म्युटेशन असे आढळले असून आजपर्यंत भारतात त्यांची ओळख पटलेली नाही आहे. S:N 801, S:C480R, NSP14:C279F ECf NSP3:L550DEL असे चार कोरोनाचे म्युटेशन आढळले आहेत.’

आतापर्यंत अनेक अभ्यासातून गटारात विषाणू आढळल्याचे समोर आले आहे. शिवाय काही देशातील सांडपाण्यात कोरोनाचे म्युटेशन आढळले आहे. परंतु भारतात अशाप्रकारे अभ्यास झाला नव्हता. यावर अजून अभ्यास झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त म्युटेशन आणि त्याचा परिणाम जाणून घेता येतील, असे डॉ. दिव्येंदु वर्मा म्हणाले.


हेही वाचा – रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या भीतीमुळे घाबरू नका, लस घ्या अन्यथा… – तज्ज्ञ


 

- Advertisement -