घरमहाराष्ट्रअतिधोकादायक देशातून आलेले 109 प्रवासी गायब

अतिधोकादायक देशातून आलेले 109 प्रवासी गायब

Subscribe

ओमायक्रॉनचे संक्रमण फैलावण्याची भीती वाढली

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची दहशत असताना आता परदेशातून मुंबईत आलेले 100 पेक्षा अधिक प्रवासी गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असतानाच राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती जारी केली आहे. बेपत्ता असलेले हे प्रवासी अतिधोकादायक देशांमधून मुंबईत आले होते. महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 झाली आहे. तर 11 संशयित रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत.

परदेशातून ठाणे जिल्ह्यात 295 प्रवासी आले होते. त्यातील 109 जणांचा काहीच पत्ता लागत नाही. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि पत्ता नमूद केला होता. परंतु, या सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांनी दिलेला पत्ता तपासून पाहिला असता तो देखील खोटा निघाला आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. हे बेपत्ता असलेले नागरिक जोपर्यंत सापडत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात संक्रमण फैलावण्याची भीती वाढली आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोकादायक देशांतून भारतात येणार्‍या लोकांना सात दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा नियम बनवला आहे. अशा लोकांची सात दिवसांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

अतिधोकादायक देशांमधून भारतात येणार्‍या सर्वांना 7 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जात आहे. या दरम्यान त्यांची दुसर्‍या, पाचव्या आणि आठव्या दिवशी आरटीपीसीआर टेस्ट घेतली जाते. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुन्हा होमक्वारंटाइन केले जात आहे. सर्व हाऊसिंग सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनी याची जबाबदारी दिली असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -