घरताज्या घडामोडीयंदा १० वी, १२ वी परीक्षांचा निकाल लांबणार ? हे आहे कारण

यंदा १० वी, १२ वी परीक्षांचा निकाल लांबणार ? हे आहे कारण

Subscribe

यंदाच्या १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकडवाड यांनी केली. ज्या भागात अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा देता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्याठिकाणी कंटेन्टमेंट झोन असतील, संचारबंदी असेल किंवा परीक्षार्थी विद्यार्थ्याला किंवा कुटूंबीयांना कोरोनाची लागण झाल्यास अशा परिस्थितीमध्ये ही विशेष परीक्षा घेण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्यामुळेच यंदाच्या निकालावरीलही या जून महिन्याच्या परीक्षेचा परिणाम होईल अशी शक्यता आहे. तर जुलै महिन्यात रिपिटर्ससाठीची परीक्षा घेण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. (10th, 12th exam results may delayed due speacial exam because of covid-19 situation in mharashtra)

कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्या भागात संचारबंदी किंवा कंटेन्टमेंट झोन असतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षेतून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाची लागण होणारे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना कोरोनाची लागण झाल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा ही जूनमध्ये घेण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा, विशेष परीक्षा तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या परिक्षेमुळे एकुणच निकालावर परीणाम होईल हे स्पष्ट आहे. त्यामध्ये प्रात्यक्षिकांसाठीचा कालावधी पाहता या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा निकालावर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळेच ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी काही पालकांकडून होत होती. पण अनेक विद्यार्थ्यांनी दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण पाहता ही परीक्षा ऑफलाईन घेण्याची विनंती शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसारच परीक्षा विभागाने या संपुर्ण प्रतिसादाचा अभ्यास करत ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

प्रात्यक्षिकांसाठीही वाढीव वेळ

यंदाच्या वर्षी १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठीही शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना असाईनमेंट तर बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे १० वी किंवा १२ वी च्या विद्यार्थ्यास प्रात्यक्षित परीक्षा कालावधीत कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कंटेन्टमेंट झोन, संचारबंदी किंवा कोरोना परिस्थितीमुळे अतिरिक्त अशी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- Advertisement -

विशेष परीक्षेचे आयोजन

परीक्षा कालावधीत कोरोनाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांना किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन, कंटेन्टमेंट झोन, संचारबंदी किंवा कोरोना परिस्थितीमुळे परीक्षेसाठी न येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन हे जून महिन्यामध्ये करण्यात येईल. तसेच ही परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी तसेच ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

पुरवणी परीक्षा

परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. तसेच सदरची परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयात निश्चित करण्यात येतील असे शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -