घरमहाराष्ट्रलसीकरण ठरलं 'त्या' चिमुरडीसाठी जीवघेणं

लसीकरण ठरलं ‘त्या’ चिमुरडीसाठी जीवघेणं

Subscribe

एकीकडे मुलीचा मृत्यू गोवर-रुबेला लसीकरणामुळे झाल्याचा आरोप पालक करत असताना, दुसरीकडे विंचू चावल्याने चिमुरडी दगावल्याचं डॉक्टरांचं सांगणं आहे.

विविध आजारांपासून लहान बालकांचा बचाव व्हावा याकरिता राज्य शासनाने गोवर-रुबेला लसीकरण मोहीम हातात घेतली आहे. राज्यातील एकही बालक लसीकरणातून सुटू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, याच लसीकरणामुळे एका चिमुरडीचा मृत्यू झाला असल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्यात हा दुर्देवी प्रकार घडला असून, यामध्ये एक ११ महिन्यांची मुलगी दगावली आहे. काही दिवसांपूर्वी या चिमुरडीचं लसीकरण झालं होतं. मात्र, त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेल्यामुळे तिला आधी भंडाऱ्याच्या आणि नंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्येच त्या चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. दरम्यान, लसीकरणमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. लसीकरण झाल्यानंतर  लहान मुलांना काही प्रमाणात उलट्या, मळमळ व चक्कर येऊ शकते याबद्दल आरोग्य विभागाने आधीच स्पष्ट केले होते. शिवाय हा त्रास प्रत्येक बालकास होणार नसून प्रत्येकाच्या प्रतिकार शक्तीवर ते अवलंबून असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे चिमुरड्याच्या मृत्यूला लसीकरण कितपत जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

मृत्यू नक्की कशामुळे?

काही दिवसांपूर्वी गावातील अंगणवाडी केंद्रात गोवर- रुबेला लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबीरात ११ महिन्याचा आराध्या वाघाये या चिमुरडीच्या आई वडिलांनी तिचे लसीकरण करवून घेतले. लसीकरण झाल्यानंतर काही तासांनी आराध्याला उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेल्यामुळे तिला आधी लाखनी आणि नंतर भंडारा व नागपूर येथील मेवो रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचरादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान घडलेल्या प्रकाराला लसीकरण जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केले आहे. ज्या प्राथमिक केंद्रातून हे लसीकरण मागविण्यात आले होते. मात्र, तिथल्या डॉक्टरांनीदेखील लसीकरण योग्य असल्याचे म्हटले आहे. तर नागपूर येथील मेयो रुग्णालयातील डॉक्टारांनी विंचू चावून मृत्यू झाल्याचं सागिंतल आहे. मात्र, ही बाब पालकांनी फेटाळली असून याबाबत आता चौकशी सुरु असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात येत आहे. याआधी गोवर रुबेलाच्या लसीकरणानंतर गोंदिया येथील ६ विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -