घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटनगर जिल्ह्यात नवे ११ नवे रुग्ण; ७८ कोरोनामुक्त

नगर जिल्ह्यात नवे ११ नवे रुग्ण; ७८ कोरोनामुक्त

Subscribe

संगमनेरात कोरोनाबाधितांनी गाठले अर्धशतक

तीन कोरोनाबाधित रुग्णांसोबत सुरु झालेल्या संगमनेरमधील रुग्णसंख्येच्या आकड्याने मंगळवारी अखेर पन्नाशी गाठली. तालुक्यातील मालुंजे डिग्रस येथे मुंबईवरुन आलेल्या बाधित महिलेल्या संपर्कातील ४५ व २१ वर्षीय महिलांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारील अकोले तालुक्यात एकाच दिवशी तब्बल सहा नवे रुग्ण आढळल्याने अकोल्यातील बाधितांची संख्या १८ वर गेली. जिल्ह्यात पाच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

संगमनेरमध्ये डिग्रस मालुंजे येथे आढळलेल्या बाधित महिलेच्या संपर्कातील दोन महिलांना लागण झाली. तर अकोले तालुक्यातील जवळे येथील ४८ व २४ वर्षीय महिलांसोबत २८ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. वाघापुर येथे ३२ आणि ४० वर्षीय महिलेबरोबर ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला असून हे सर्वजण याआधीच्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. याशिवाय श्रीगाेंदा येथील कांडेगाव येथे ७५ वर्षीय वृध्दा बाधित आढळली आहे. लोणी (राहाता) येथे ५६ व्यक्तीसोबतच नगर शहरातील स्टेशनरोडवरील एक ३३ वर्षीय महिला बाधित असल्याचे अहवाल जिल्हा प्रयोगशाळेकडून आरोग्य विभागाला मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १६३ वर गेली आहे.

- Advertisement -

मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना नगरच्या बुथ रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यात संगमनेरमधील एक, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एक, पारनेरच्या म्हसणे फाटा येथील एक आणि नगरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. मंगळवारच्या अहवालात ११ नव्या रुग्णांसोबत ४० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर जिल्ह्याबाहेरील चाळीस रुग्ण नगरमध्ये उपचार घेत आहेत. यांच्यासह आता नगरमध्ये ७३ एक्टीव्ह केसेस असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. संगमनेरमध्ये तीन दिवसात सोळा रुग्ण आढळले आहे. मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली. तर सोमवारी रात्री संगमनेरच्या मदिनानगरमधील एका ३५ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या निकटच्या संपर्कातील काही जणांना प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

नाशिक पोलिस दलातील पोलीसदेखील बाधीत

संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील मुळचा रहिवासी आणि नाशिक पोलीस दलात असलेला कर्मचारीदेखील सोमवारी रात्री करोना बाधित असल्याचे समोर आल्याने या पोलिसाच्या संपर्कातील सहा हायरिस्कमधील लोकांना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. सदर कर्मचारी जवळपास दोन आठवडे मंगळापुरमध्ये होता, आराेग्याच्या तक्रारीवरुन नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या या कर्मचाऱ्याचादेखील अहवाल पॉझििटव्ह आला आहे. तर मोमीनपुऱ्यासह शहरातील बहुतांशी संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ही संगमनेरकरांसाठी समाधानाची बाब ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -