Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सावंतवाडीच्या विकासासाठी ११० कोटींचा निधी, समृद्धी प्रमाणेच मुंबई - सिंधुदुर्ग महामार्ग करणार...

सावंतवाडीच्या विकासासाठी ११० कोटींचा निधी, समृद्धी प्रमाणेच मुंबई – सिंधुदुर्ग महामार्ग करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

नारायण राणे यांच्या मंत्रालयाकडून सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला आहे. त्यामुळे येथे विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भातील १७ जिल्हे हे विकासाच्या मार्गावर आले आहेत. असाच महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान बांधण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी यावेळी केली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या सुक्ष्म व लघू उद्योग मंत्रालय आणि राज्य सरकारकडून सावंतवाडीच्या विकासासाठी (Sawantwadi Development Project) ११० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून सावंतवाडीच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई ते सिंधुदुर्ग महामार्ग (Mumbai to Sindhudurg Highway)
तयार करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सिंधुदुर्गातील विविध विकासकामांचे भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उद्योग मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant), क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Sports and Youth Welfare Minister Girish Mahajan), नीतेश राणे, निलेश राणे यांची उपस्थिती होती.

नारायण राणे यांच्या मंत्रालयाकडून सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला आहे. त्यामुळे येथे विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भातील १७ जिल्हे हे विकासाच्या मार्गावर आले आहेत. असाच महामार्ग मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान बांधण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी यावेळी केली.

- Advertisement -

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव 

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै ( Barrister Nath Pai Airport) यांचे नाव देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. सिंधुदुर्ग हा निसर्गसंपन्न जिल्हा आहे असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, “येथे पर्यटानाला मोठी संधी आहे, त्या दृष्टीने या जिल्ह्याचा विकास करण्याचा ‘आपलं सरकारचा’ प्रयत्न असल्याचं आहे.”
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करत असल्याचंही आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

- Advertisement -

संपूर्ण देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरु असल्याचं शिंदेंनी सांगितलं. “मागील अडीच वर्षांतील सरकारने अनेक प्रकल्पांना स्पीड ब्रेकर लावले होते,” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

सावंतवाडीत पंतप्रधान मोदींचे कौतुक 

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून पूर्ण मदत मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र सरकारकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केले जात आहेत. त्यात कोणतीही कपात न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या प्रस्तावांना मान्यता दिली जात आहे.” पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडून होणाऱ्या मदतीसाठी शिंदेंनी यावेळी त्यांचे आभार मानले. दावोसमध्ये मोदींचे कौतुक झालं, ते मोदींचे जगभरात वाढत असलेले महत्त्व अधोरेखीत करत आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -