घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात ११,०८८ नव्या रुग्णांची नोंद, २५६ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात ११,०८८ नव्या रुग्णांची नोंद, २५६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज २५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८ लाख ३७ हजार ५७८ नमुन्यांपैकी ५ लाख ३५ हजार ६०१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.४२ टक्के एवढा आहे.

राज्यात २५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा १६, वसई विरार मनपा ७, नाशिक १३, जळगाव ७, पुणे ४८, कोल्हापूर २७, नागपूर १२ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण २५६ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११ मृत्यू ठाणे जिल्हा ७, पालघर २, कोल्हापूर १ आणि नाशिक १ असे आहेत.

- Advertisement -

राज्यातील Active रुग्ण

राज्यात सध्या ५ लाख ३५ हजार ६०१ जण कोरोनाबाधित असून यामध्ये १ लाख ४८ हजार ५५३ जण Active रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तर आतापर्यंत राज्यात १८ हजार ३०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – गणेशोत्सव काळात कोकणात अखंडित वीजपुरवठा करा – ऊर्जामंत्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -