घरताज्या घडामोडीराज्यात २,३२५ पोलीस कोरोनाग्रस्त, २४ तासांत ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

राज्यात २,३२५ पोलीस कोरोनाग्रस्त, २४ तासांत ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या आकडा देखील कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण राज्यात दोन हजार ३२५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी कोरोनाग्रस्त एका पोलीसाने प्राण गमावले असून आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात शुक्रवारी दोन हजार ६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ हजार २२८ झाली आहे. तसेच ११६ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन हजार ९८ झाली आहे. तसेच आठ हजार ३८१ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २६ हजार ९९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रुग्ण दुप्पटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार हजार ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,९६४ नवे रुग्ण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -