घरमहाराष्ट्रशिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत, गुलाबराव पाटील यांचा दावा

शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत, गुलाबराव पाटील यांचा दावा

Subscribe

यानंतर काल रात्री उशिरा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील जळगावात पोहोचले. यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार काल (मंगळवारी) आपल्या घरी पहिल्यांदा पोहोचले. यानंतर काल रात्री उशिरा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील जळगावात पोहोचले. यावेळी गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार सोबत –

- Advertisement -

शिंदे सरकार स्थापनेनंतर बंडखोर माजी मंत्री गुलाबराव पाटील प्रथमच जळगावमध्ये आले. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र, उद्धव ठाकरेंना आम्ही सोडले नाही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडले. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले.

उद्धव ठाकरेंनी फसवणाऱ्या लोकांना दूर करावे –

- Advertisement -

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बंडखोर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावे, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -