घरमहाराष्ट्रदुर्देवी अंत: फटक्यांच्या स्फोटामध्ये चिमुरड्याचा मृत्यू

दुर्देवी अंत: फटक्यांच्या स्फोटामध्ये चिमुरड्याचा मृत्यू

Subscribe

प्रणव भाई असं मृत झालेल्या मुलाचं नाव असून, ऐन सणासुदीला ही दुर्देवी घटना घडल्यामुळे गावामध्ये दु:खाचं वातावरण पसरलं आहे.

गुरुवारी (काल) राज्यभरात मोठ्या उत्साहात दसरा साजरा करण्यात आला. मात्र, सांगलीमध्ये काल दसऱ्याच्या सेलिब्रेशनला गालबोट लागलं. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद गावामध्ये दसऱ्यानिमित्त फटक्यांची आतषबाजी सुरु होती. मात्र, आतषबाजीदरम्यान फटाक्यांचा स्फोट होऊन एका १२ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. प्रणव भाई असं मृत झालेल्या मुलाचं नाव असून, ऐन सणासुदीला ही दुर्देवी घटना घडल्यामुळे गावामध्ये दु:खाचं वातावरण पसरलं आहे. गुरुवारी दसऱ्याच्या निमित्ताने प्रणव घराबाहेर ‘कागदी शिंगटे’ (लवंगी मिरची फटाक्याचा एक प्रकार) उडवत होता. यादरम्यान अचानक शिंगट्याचा स्फोट झाला आणि त्यामुळे प्रणव भाजून गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर प्रवीणच्या कुटुंबियांनी तात्काळ त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनीही प्रणवर लगेचच उपचार सुरु केले.


वाचा: भाजप विरोधात मनसेचा मुकमोर्चा

मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. फटाक्याच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या प्रणव वाचू शकला नाही. शुक्रवारी (आज) पहाटे उपचारादरम्यान प्रणवचा मृत्यू झाला. आज दुपारी कवठेएकंद गावामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात प्रणवचा अंत्यविधी पार पडला. या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. १२ वर्षाचा प्रणव कवठेएकंद गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता.


वाचा: पोलिसाच्या पोराचा फिल्मी राडा, पोलिसालाच बेदम मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -