घरCORONA UPDATECorona Update: राज्यात मागील २४ तासांत १२० जणांचा मृत्यू तर २ हजार...

Corona Update: राज्यात मागील २४ तासांत १२० जणांचा मृत्यू तर २ हजार २५९ नवे रुग्ण!

Subscribe

राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे १२० जणांचा मृत्यू झाला असून २ हजार २५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा ३ हजार २८९वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार ७८७ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत राज्यात १ हजार ६६३ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आजपर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई ५८, ठाणे १३, मीरा भाईंदर ६, पनवेल ३, वसई विरार २, नवी मुंबई १, नाशिक ३, पुणे १६, सोलापूर २, रत्नागिरी १, औरंगाबाद १०, अकोला २, अमरावती १, नागपूर १ आणि मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात ५ लाख ६८ हजार ७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६,४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत. तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तसेच ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये (७५.८ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.

- Advertisement -

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ५११०० १७६०
ठाणे १३२९ २३
ठाणे मनपा ५१७१ १३१
नवी मुंबई मनपा ३६९५ ८७
कल्याण डोंबवली मनपा १९७७ ३६
उल्हासनगर मनपा ५७० २१
भिवंडी निजामपूर मनपा ३४२ १२
मीरा भाईंदर मनपा ९७९ ४५
पालघर २२१
१० वसई विरार मनपा १४१५ ३७
११ रायगड ७६४ २९
१२ पनवेल मनपा ७३६ २९
१३ नाशिक २६९
१४ नाशिक मनपा ५३५ २२
१५ मालेगाव मनपा ८५६ ६५
१६ अहमदनगर १५८
१७ अहमदनगर मनपा ५२
१८ धुळे ११३ १३
१९ धुळे मनपा १७७ १२
२० जळगाव ८६८ १००
२१ जळगाव मनपा २८१ १५
२२ नंदूरबार ४०
२३ पुणे ६७५ १७
२४ पुणे मनपा ८७०८ ३९५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६९० १७
२६ सोलापूर ९९
२७ सोलापूर मनपा १३६९ १०५
२८ सातारा ६५८ २७
२९ कोल्हापूर ६४३
३० कोल्हापूर मनपा २७
३१ सांगली १६७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३
३३ सिंधुदुर्ग १३०
३४ रत्नागिरी ३७८ १४
३५ औरंगाबाद ५८
३६ औरंगाबाद मनपा २०२७ १०८
३७ जालना २०९
३८ हिंगोली २१४
३९ परभणी ५३
४० परभणी मनपा २५
४१ लातूर १०८
४२ लातूर मनपा ३१
४३ उस्मानाबाद १२५
४४ बीड ६३
४५ नांदेड ३३
४६ नांदेड मनपा १३८
४७ अकोला ५३
४८ अकोला मनपा ७९५ ३२
४९ अमरावती २२
५० अमरावती मनपा २८१ १७
५१ यवतमाळ १६४
५२ बुलढाणा ९७
५३ वाशिम १२
५४ नागपूर ५४
५५ नागपूर मनपा ७३४ १२
५६ वर्धा ११
५७ भंडारा ४२
५८ गोंदिया ६८
५९ चंद्रपूर २७
६० चंद्रपूर मनपा १५
६१ गडचिरोली ४५
इतर राज्ये /देश ७८ २०
एकूण ९०७८७ ३२८९
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -