उस्मानाबादमध्ये उभारणार तुळजाभवानीची १२५ फूट भव्य मूर्ती

उस्मानाबाद येथील घाटशीळ परिसरात तुळजाभवानीची १२५ फूट भव्य दिव्य मूर्ती उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

125 feet statue of Tuljavani will be erected in Osmanabad
तुळजाभवानी

उस्मानाबाद आणि तुळजाभवानीच्या भक्तांकरता एक खुशखबर आहे ती म्हणजे उस्मानाबाद येथे तुळजाभवानी मातेची भव्य दिव्य अशी १२५ फुटाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील घाटशीळ परिसरात ही मूर्ती उभारण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपये खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही मूर्ती १२ मजल्याची असणार त्यामुळे भाविकांसाठी तुळजाभवानीचे मुखदर्शन घेणे सोपे होणार आहे.

११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

तुळजाभवानी मातेची भव्य दिव्य अशी १२५ फुटाची मूर्ती उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या महत्त्वाच्या बैठकीत भव्य दिव्य मूर्ती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही मूर्ती उभारण्याकरता ११ कोटी रुपये खर्च लागणार असल्याची शक्यता आहे.