घरताज्या घडामोडीCorona Update: राज्यात १२,६०८ नव्या रुग्णांची नोंद, ३६४ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात १२,६०८ नव्या रुग्णांची नोंद, ३६४ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

राज्यात ३६४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४७, ठाणे २४, नवी मुंबई मनपा १३, कल्याण डोंबिवली मनपा ४, वसई विरार मनपा ७, रायगड ८, नाशिक १८, जळगाव १२, पुणे ८७, पिंपरी चिंचवड मनपा १३, सातारा ७, कोल्हापूर १४, सांगली १९, औरंगाबाद ९, बीड ९, नागपूर १८ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३६४ मृत्यूंपैकी २७७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४१ मृत्यू ठाणे जिल्हा १६, सांगली ७, पुणे ६, रायगड ३, बीड २, कोल्हापूर १, नागपूर १, रत्नागिरी १ सोलापूर १, जळगाव १, लातूर १ आणि नाशिक १ असे आहेत. आज १०,४८४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,०१,४४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील Active रुग्ण

राज्यात सध्या ५ लाख ७२ हजार ७३४ जण कोरोनाबाधित असून यामध्ये १ लाख ५१ हजार ५५५ जण Active रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तर आज १० हजार ४८४ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४ लाख १ हजार ४४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्यातील ५८ पोलिसांचा गौरव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -