घरमहाराष्ट्रदिलासादायक! राज्यात आतापर्यंत २१,१७९ पोलिसांनी केली कोरोनावर मात

दिलासादायक! राज्यात आतापर्यंत २१,१७९ पोलिसांनी केली कोरोनावर मात

Subscribe

सध्या २ हजार ७२० पोलीस कर्मचाऱी अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू

देशासह राज्यात कोरोनाचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोरोनाच्या संसर्गाचा सामना आता कोरोना योद्ध्यांना देखील करावा लागताना दिसत आहे. कारण या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यात गेल्या २४ तासात १२७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २१ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत २५१ पोलिसांचा कोरोनामुळे बळी

यामुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या २४ हजार १५० वर पोहोचली आहे तर आतापर्यंत २५१ इतका मृतांचा आकडा झाला आहे. दिलासादायक म्हणजे २१ हजार १७९ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले असल्याचे सांगितले जात आहे. तर सध्या २ हजार ७२० पोलीस कर्मचाऱी अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ७९.६४%

एकीकडे कोरोनामुळे सुरू करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होत असताना राज्यात कोरोनाची परिस्थिती काहीशी दिलासादायक म्हणता येईल अशी आहे. राज्यात आज दिवसभरात १५ हजार ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातल्या एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ११ लाख ४९ हजार ६०३ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातला रिकव्हरी रेट आता ७९.६४ टक्क्यांवर गेला आहे. मात्र, असे असले, तरी आज दिवसभरात ३२६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ३८ हजार ८४ इतका झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर २.६४ टक्के इतका आहे. आज दिवसभरात १३ हजार ७०२ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकूण कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींचा आकडा आता २ लाख ५५ हजार २८१ इतका झाला आहे.


कोरोनावर मात करण्यासाठी ट्रम्प यांना दिलं भारतात तयार केलेलं ‘हे’ स्वस्त औषधं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -