Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी HSC Result : बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, असा पाहा रिझल्ट

HSC Result : बारावी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, असा पाहा रिझल्ट

Subscribe

बहुप्रतिक्षीत असा बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.

यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच बारावीच्या परिक्षा सुरू असतानाच काही पेपरफुटीच्या देखील घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा बारावी बोर्डाचा निकाल वेळेत लागेल की नाही, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण याबाबतची महत्त्वाची माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. बहुप्रतिक्षीत असा बारावीचा निकाल उद्या (ता. 25 मे) दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. (12th board result will be announced tomorrow)

या संकेतस्थळावर पाहू शकतात निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.inhttp://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.

- Advertisement -

05 जूनला महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतिक्षा होती ती निकालाची. निकालाची तारीख उद्याची असल्याने उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

बारावी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मागील आठवड्यात बारावीच्या बोर्डाच्या निकाल हा 31 मेला आणि दहावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली होती. तसेच, बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.


- Advertisement -

हेही वाचा – Netflix Users : नेटफ्लिक्सचा नवा नियम, आता मित्रांसोबत शेअर करता नाही येणार password

- Advertisment -