Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शनिवारपासून १२वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट, 'ही' वेबसाईट करा क्लिक

शनिवारपासून १२वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट, ‘ही’ वेबसाईट करा क्लिक

Related Story

- Advertisement -

बारावीची लेखी परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आता येत्या शनिवारपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट दिले जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेस्थळावर येत्या शनिवारपासून College login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात जर काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

हॉल तिकीट घेण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेतले जाणार नाही आहे. जेव्हा हॉल तिकीट मिळेल, त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉल तिकीटमध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. जर हॉल तिकीटवर फोटो चुकीचा असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्यमाध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.

- Advertisement -