घरमहाराष्ट्रनवी मुंबईत २७ केंद्रावर होणार बारावीची परीक्षा; ठाणे जिल्ह्यातून १ लाख ४५६१...

नवी मुंबईत २७ केंद्रावर होणार बारावीची परीक्षा; ठाणे जिल्ह्यातून १ लाख ४५६१ परीक्षार्थी

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहेत. उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या परीक्षेच्या अनुषंगाने मुंबई विभागीय मंडळाच्यावतीने संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार आहेत. उद्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार्‍या परीक्षेच्या अनुषंगाने मुंबई विभागीय मंडळाच्यावतीने संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यावर्षी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून १ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून जिल्ह्यातील १७३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. नवी मुंबईतील २७ केंद्राचा यात समावेश असणार आहे, अशी माहिती वाशी विभागीय कार्यालयातील सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या कालखंडानंतर बारावी परीक्षा ४ मार्च २०२२ मध्ये ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. मागील वर्षी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत परीक्षा पार पडली. मात्र यंदा कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाच्या फासातून मुक्त होत परीक्षा देता येणार आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात एकूण १७३ परीक्षा केंद्रे असणार आहेत. त्यात ठाणे शहरातील ३३ केंद्र, नवी मुंबई २७ केंद्र, कल्याण ५० केंद्र, उल्हासनगर १५ केंद्र, अंबरनाथ व मुरबाड ५ केंद्र, शहापूर ६ केंद्र, भिवंडी २१ आणि मीरा-भाईंदरमधील ११ केंद्राचा समावेश असणार आहे. या सर्व केंद्रावर आज २० फेब्रुवारीपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथक तैनात असणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली.

पेपर लिहिण्यासाठी देण्यात येणार अधिकची १० मिनीटे
यंदापासून १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. पण निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे अगोदर दिल्या जात होत्या. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास १० मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या नियमाचे पालन करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीपेक्षा मोठी इमारत उभारणार, सौदी अरेबियाचा निर्धार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -