HSC Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा

maharashtra hsc 12th exam begins tomorrow know the covid-19 guidelines instructions
HSC Board Exam : उद्यापासून राज्यात 12 वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी 'हे' माहिती करून घ्या

कोरोनाच्या काळ असल्यामुळे मागील दोन वर्षात परीक्षा झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा तोटा होत असल्याची मत पालकांकडून व्यक्त होत होती. तसेच यावरती तोडगा काढण्याचे मत मांडले जात होते. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे यावर्षीही बारावीची परीक्षा होईल की नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. परंतु बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागेल आहेत. पण विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापूर्वी आणखीन एक परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि काळजीच्या दृष्टीकोनातून परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ही परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना आणखीन कोणती परीक्षा द्यावी लागणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर केंद्रावर पोहोचायचे आहे. म्हणजेच साडे नऊ वाजता विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. यावेळी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाईल. जर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधित शंका उपस्थित झाली तर काय निर्णय घ्यायचा हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात संबंधित केंद्र निर्णय घेईल. दरम्यान आता विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा असल्यामुळे त्यांना परीक्षेपूर्वी या परीक्षेला सामोर जावे लागणार आहे.

सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग झाल्यानंतर त्यांना ऑफलाईन परीक्षा द्यायला कितपत जमेल असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी मोजके सामान घेऊ जावे लागणार आहे. तसेच प्रत्येक पेपरला विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.


हेही वाचा – 12th Board Exam : बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, ५ आणि ७ मार्चचे पेपर पुढे ढकलले