Maharashtra Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी राज्यात एकही Omicron रुग्ण नाही, कोरोनाबाधित रूग्णांची संख्याही घटली

आज रोजी राज्यात एकूण २७ हजार ८९१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या ही ७४ लाख ९१ हजार ७५९ इतकी आहे.

राज्यातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस कमी होत असताना आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशतही कमी होऊ लागली आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी एकाही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट सुरू आहे. आज, शुक्रवारी राज्यात १३ हजार ८४० नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हीच संख्या १५ हजारांहून अधिक होती. आज या संख्येत दोन हजारांनी घट झाली आहे. राज्यातील कोरोनाची तिसरी लाट येऊन गेल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील मृत्यू संख्या पाहता आज राज्यात ८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा मृत्यूदरही कमी असून रिकव्हरी रेटही वाढला आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.८३टक्के इतका आहे तर रिकव्हरी रेट ९६.२६ टक्के झाला आहे.

आज रोजी राज्यात एकूण २७ हजार ८९१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत रिकव्हर झालेल्या रुग्णांची संख्या ही ७४ लाख ९१ हजार ७५९ इतकी आहे. राज्यातील एकूण अँक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता राज्यात आजच्या तारखेला एकूण १ लाख ४४ हजार ११ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत सध्या ७ हजार १३५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात ९ हजार ७६०, पालघरमध्ये ८२७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण अँक्टिव्ह रुग्णांचा सविस्तर तपशील पहा

.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०४९२७६ १०२२६९२ १६६५४ २७९५ ७१३५
ठाणे ७६२३६१ ७४०७७८ ११७८८ ३५ ९७६०
पालघर १६२६९१ १५८४६५ ३३८४ १५ ८२७
रायगड २४२३१६ २३४१९९ ४८९१ ३२१९
रत्नागिरी ८३९२७ ८०६७१ २५२३ ७२८
सिंधुदुर्ग ५६८३५ ५४६६३ १४९१ १५ ६६६
पुणे १४२७८२१ १३६४७१५ २०००१ ३५० ४२७५५
सातारा २७५८७१ २६५२९० ६६१२ ३४ ३९३५
सांगली २२५१७७ २१७०४८ ५६४८ २४७२
१० कोल्हापूर २१९१४६ २१०२०५ ५८७९ ३०५७
११ सोलापूर २२५१४२ २१५७१६ ५६८४ ११४ ३६२८
१२ नाशिक ४६८१७७ ४५०६४२ ८८४३ ८६९१
१३ अहमदनगर ३६९७३४ ३५४८३९ ७२०० ११ ७६८४
१४ जळगाव १४८६३६ १४३८९७ २७२३ ३३ १९८३
१५ नंदूरबार ४५५०६ ४३७५५ ९५१ ७९७
१६ धुळे ५०१५७ ४८९४२ ६५९ ११ ५४५
१७ औरंगाबाद १७४१३७ १६५२७२ ४२६९ १४ ४५८२
१८ जालना ६५९३२ ६३६१३ १२२१ १०९७
१९ बीड १०८४९७ १०४६६० २८५९ ९७१
२० लातूर १०३८८० ९९५८० २४६७ १८२७
२१ परभणी ५७९९३ ५६०२१ १२४१ २० ७११
२२ हिंगोली २१३७६ १९८२६ ५०८ १०४१
२३ नांदेड १०१८४४ ९७१२२ २६८४ २०३१
२४ उस्मानाबाद ७४०८० ७१०४३ २०१० ११६ ९११
२५ अमरावती १०३९४७ १००५४४ १६०७ १७९४
२६ अकोला ६५५६८ ६३२१४ १४५१ ८९९
२७ वाशिम ४४७१६ ४३२३५ ६३७ ८४१
२८ बुलढाणा ८९०१३ ८५३०७ ८१४ २८८६
२९ यवतमाळ ८१११० ७७८११ १८०७ १४८८
३० नागपूर ५६८११३ ५४१३८० ९१३३ ७१ १७५२९
३१ वर्धा ६४७७६ ६०६२१ १२२९ १६९ २७५७
३२ भंडारा ६६८३६ ६४३१५ ११२९ १० १३८२
३३ गोंदिया ४४९४० ४३५०८ ५७७ ८४८
३४ चंद्रपूर ९८०६० ९५०३१ १५७३ १४५२
३५ गडचिरोली ३४९०५ ३३१०८ ६८२ ३३ १०८२
इतरराज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ७७८२६४० ७४९१७५९ १४२९४० ३९३० १४४०११

 


हेही वाचा – India Corona Update : देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत 13 टक्क्यांनी घट ; मृत्यू दरात वाढ