घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ४ बाधितांचा मृत्यू; १३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये ४ बाधितांचा मृत्यू; १३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, गुरूवारी (दि. ११) दिवसभरात १३ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहर ४, नाशिक ग्रामीण ४, मालेगाव ४, चोपडा, जळगाव येथीक एकाचा समावेश आहे. दिवसभरात ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील ३ व नाशिक शहरातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७३७ बाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात ५१६ रूग्ण आहेत. १ हजार ७३७ पैकी ११५२ रूग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १८८, नाशिक शहर १९६, मालेगाव ७१९ व जिल्ह्याबाहेरील ४९ रूग्णांचा समावेश आहे.

मालेगावपाठोपाठ नाशिक शहर, सिन्नर व नांदगाव तालुक्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन पोलीस दल, इतर विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्हा प्रशासनास गुरूवारी दिवसभरात दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात सकाळी ८.३० वाजता मालेगावातील ७४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ६ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. दुसर्‍या टप्प्यात दुपारी १२.३० वाजता ३० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये येवला येथील ५० व ६२ वर्षीय पुरुष आणि पारोळा (जि.जळगाव) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण १४ हजार ३६३ संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार ७३७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, १२ हजार ३४५ रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २८१ अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ६०, नाशिक शहर १२४, मालेगाव ९७ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १६७ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण रूग्णालय ३४, नाशिक महापालिका रूग्णालये ११४, जिल्हा रूग्णालय १४, डो. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय १, मालेगाव रूग्णालये ४ रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

शहरात पाच ठिकाणे निर्बधमुक्त; एक नवे प्रतिबंधित क्षेत्र
शहरात करोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून रूग्ण राहत असलेली इमारत १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली होती. या ठिकाणी १४ दिवसांत नवीन रूग्ण आढळून न आल्याने नाशिक महापालिकेने ५ ठिकाणे निर्बंधमुक्त केले आहेत. सरस्वतीनगर-रासबिहारीसमोर, साहिल हाईट्स-पखालरोड, नियती-दिपालीनगर, रघुनाथ सोसायटी, दत्त मंदिर निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. तर, गुरूवारी बाधित रूग्ण आढळून आल्याने शाहू पथ-बिटको रूग्णालयजवळील इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण 173७ (मृत-१०९)
नाशिक ग्रामीण -२८९ (मृत-१३)
नाशिक शहर-५१६ (मृत-२६)
मालेगाव शहर-८६२ (मृत-६४)
अन्य – ७० (६)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -