मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले, दिवसभरात १,३०८ रुग्णांची नोंद!

corona patient
कोरोना विषाणू

मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढले आहेत. आज पुणे शहरात दिवसभरात १ हजार ३०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ५१ हजार ७३८वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी १ हजार २५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ३२ हजार ६२३ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत २ हजार ५४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १ हजार ७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज शहरात ३१६ बरे झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्येने १९ हजारांच्या टप्पा ओलांडला असून एकूण संख्या १९ हजार ४३१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पालिका रुग्णालयात ३ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत २४ तासांत आढळले १,११८ नवे रुग्ण, ६० जण मृत्यूमुखी!

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ११८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ११ हजार ९६४वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ६ हजार २४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत ९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८५ हजार ३२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Corona Update: चिंता वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार!