घरमहाराष्ट्रआता सरकारी रुग्णालयावर तिसरा डोळा; राज्यभर लागणार १३६० सीसीटीव्ही

आता सरकारी रुग्णालयावर तिसरा डोळा; राज्यभर लागणार १३६० सीसीटीव्ही

Subscribe

डॉक्टरांवर होणारे हल्ले, यासह रुग्णालयात घडणाऱ्या इतर घटना रोखण्यासाठी आता राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्य भरातील सरकारी रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

डॉक्टरांवर होणारे हल्ले, यासह रुग्णालयात घडणाऱ्या इतर घटना रोखण्यासाठी आता राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. राज्य भरातील सरकारी रुग्णालयात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला आणि जिल्हा रुग्णालयात एकूण १३६० सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय सकाराच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. जवळपास ४ करोड २ लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण ४९८ रुग्णालयात सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, यासाठी सरकारच्या आरोग्य विभागाने मंजुरी देखील मिळवली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सरकारने याचा जीआर देखील काढला आहे. या सीसीटीव्ही कॅमेराची नजर रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर, ओपीडी, छोट्या मुलांच्या कक्षात, ऑपरेशन थिएटरच्या परिसरात, कर्मचाऱ्यांच्या रूममध्ये असणार आहे.

असा होणार खर्च

४९८ रुग्णालयात एकूण १३६० सीसीटीव्ही लागणार असून, यासाठी एकूण ४ करोड २ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. यामध्ये २६६ सीसीटीव्हीची सिस्टीम खरेदी करण्यासाठी २ करोड ६६ लाख रुपये आणि १३६० कॅमेरे खरेदी करण्यासाठी १ करोड ३३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार ६ ग्रामीण रुग्णालय, २० उपजिल्हा आणि महिला रुग्णालय, परभणी येथील हाडांचे उप जिल्हा रुग्णालय १२, तसेच १०० ते २०० बेडच्या रुग्णालयात ३०, २०१ ते ४०० बेड च्या रुग्णालयात ४०, आणि ४०० बेडहून अधिक क्षमता असलेल्या रुग्णालयात ५० सीसीटीव्हीची आवश्यकता लागू शकते.

- Advertisement -

या रुग्णालयत लागणार सीसीटीव्ही

रुग्णालयाची नाव                           एकूण सीसीटीव्ही

नागपूर डागा महिला रुग्णालय                    २४

- Advertisement -

बुलढाणा जिल्हा रुग्णालय                        ६४

परभणी जिल्हा रुग्णालय                          ३९

अकोला महिला रुग्णालय                           ८

पुणे                                                    १९

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय                      १९

वर्धा जिल्हा रुग्णालय                                ६

सातारा जिल्हा रुग्णालय                            २२

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय                           १०

हिंगोली जिल्हा रुग्णालय                            १२

नंदूरबार जिल्हा रुग्णालय                           १४

जालना जिल्हा रुग्णालय                            २२

औरंगाबाद जिल्हा रुग्णालय                        २४

धुळे जिल्हा रुग्णालय                                १४

ठाणे सिव्हिल रुग्णालय                               १३

रायगड सिव्हिल रुग्णालय                           २७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -