Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सिंधुदुर्गात जाणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सक्तीचं

सिंधुदुर्गात जाणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सक्तीचं

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरुन दाखल होणाऱ्या प्रत्येकाला १४ दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलं आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके, रेल्वे स्टेशन व आरोग्य विभागा मार्फत शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे क्वारंटाइनचे पालन करावयाचे आहे. क्वारंटाइन असलेल्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यानी दिला आहे. आज ऑनलाईन पत्रकार परिषद घेत त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा आहे, तरी देखील कोल्हापूर व रायगड मधून अधिकचा ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. कोविड रुग्णासाठी ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध आहेत. तरी देखील कोविड केअर सेंटर असलेल्या काही ठिकाणी ऑक्सिजन बेड तयार करण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचे ही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना सोईचे होईल असे नियम व नियोजन जिल्हाधिकारी यानी करावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ग्रामकृती दलांना विमा संरक्षण देण्याबाबत आमचा सुरुवाती पासूनच प्रयत्न आहे. पण केंद्र सरकारनेच अचानकपणे विमा संरक्षण कवच काढून घेतल्याचे त्यानी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

- Advertisement -