घरताज्या घडामोडीप्रचाराच्या शेवटच्या दिवशी नोटांचा पाऊस, चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नोटांचा पाऊस, चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त

Subscribe

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार मागील काही दिवसांपासून सुरू होता. परंतु या प्रचाराचा शेवट आज झाला. २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. तसेच २ मार्चला या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. परंतु सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नोटांचा पाऊस पडला. यावेळी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

चिंचवडमध्ये 14 लाखांहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमधील दळवीनगरमध्ये ही रक्कम घेऊन जाणारी कार ताब्यात घेतली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही रोकड कोण, कुठे आणि कशासाठी घेऊन जात होता, याचा तपास निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून केला जात आहे.

- Advertisement -

१० तारखेला देखील याच दळवीनगर भागात निवडणूक विभागाच्या पथकाने 42 लाखांची रोकड ताब्यात घेतली होती. मात्र, आता चिंचवडमध्ये आचारसंहिता लागू आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे.

ज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झालेला असताना दुसरीकडे पुण्यात पोटनिवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुण्यातील जनतेचा कौल आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिवसेना-भाजपा महायुती आणि ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीनेही जोरदार प्रचार सभा घेतल्या आहेत. आता घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुपा प्रचार सुरू; पुणेकरांचा कौल कोणाला?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -