घरताज्या घडामोडीदिलासा! नगर जिल्ह्यातील १४ जणांची चाचणी निगेटिव्ह!

दिलासा! नगर जिल्ह्यातील १४ जणांची चाचणी निगेटिव्ह!

Subscribe

नगरमध्ये सापडलेल्या एकमेव करोनाग्रस्त रुग्णानंतर एकही करोनाची केस सापडली नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नगरमध्ये करोनाची बाधा झालेला एक रुग्ण सापडला असला तरी यानंतर मात्र एकही करोनाबाधित रुग्ण अद्याप सापडला नसल्याने नागरिक आणि प्रशासनासाठी ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी आज १४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही!

दरम्यान, मंगळवारी (१७ मार्च) पुन्हा ५ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर ५ जणांना जिल्हा रुग्णालयात तर २ जणांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. करोनाचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी आणखी काही दिवस सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळण्याचा सल्ला राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘ज्या १४ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, ते निगेटिव्ह असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

- Advertisement -

‘नागरिकांनी तपासणी करून घ्यावी’

चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. परदेशातून परत आलेल्या नागरिकांनी स्वतःहून त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या नागरिकांना घरीच वेगळे देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा तसे संबंधितांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असेही ते म्हणाले.


हेही वाचा – केरळमध्ये ६५ लाख लोकांना करोनाची शक्यता; होऊ शकतात २ लाख २७ हजार मृत्यू; IMAचं पत्र!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -